
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथील कृषी कन्या कु.संचाली विकासराव राऊत हिने ग्रामीण कार्यानुभव कार्या अंतर्गत सरई येथे बिज प्रकियेचे तसेच बिज प्रकिया केल्याने उगवण शक्ती वाढण्यास मदत होते.
रोगकारक बुरशीचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण होते, प्रत्येकवर्षी पेरणीपूर्वी प्रत्येक बियाण्यांची बिज प्रकिया करणे अत्यंत आवश्यक असते.असे अनेक फायदे तसेच बिज प्रकिया कशी करावी याबाबत संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
उपक्रमास प्राचार्य यांचे सह अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच कार्यक्रमास राजु महाजन, पुंडलिक वानखडे, विकास राऊत,परेश देशमुख यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
