कोळी येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाची कार्यकरणी जाहीर

कृष्णा चौतमाल प्रतिनिधी.

निवघा – पासून जवळच असलेल्या कोळी येथे गेले अनेक वर्षांपासून दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. पण गेल्या काही वर्षात कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षी यात थोडा फार फरक जाणवला होता. तसेच या वर्षी दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या वर्षी गावच्या प्रतिष्ठित नागरिकांनी मात्र दुर्गा महोत्सवाकडे पाठ फिरवली. म्हणून गावातील तरुण मुलांनी या वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात दुर्गा महोत्सव पार पडणार असे सांगितले. या दुर्गा महोत्सवाची दि 14 तारखेला सायंकाळी बैठक पार पडली यात बहुमताने मातोश्री सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या अध्यक्ष पदी गोविंद पाटील चौतमाल तर उपाध्यक्ष पदी गणेश पाटील कदम यांची निवड करण्यात आली.
सचिव म्हणून रामदास पाटील शिरसागर
सहसचिव रामा जाधव कोषाध्यक्ष परमेश्वर विष्णू जगताप व तसेच सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर सदस्य म्हुणन गंगाधर पाटील चौतमाल , भागवत पाटील कदम , कृष्णा पाटील चौतमाल , बालाजी कदम , सुनील जाधव , भागवत चौतमाल , परमेश्वर पाटील चौतमाल , गोलू चौतमाल , गोलू जगताप , गजानन कदम , समाधान क्षीरसागर , गजानन क्षीरसागर आदी ची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. व आयोजक म्हणून समस्त कोळी गावकरी आहेत.