
मा पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी परिसरात कोणतेही अवैध धंदे चालणार नाही याबाबत निर्देश दिले असून त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन वडकी येथील पोलिस अंमलदार विलास जाधव यांना दिनांक 11/ 3/ 2023 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की देवधरी, दहेगाव परिसरात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर हा अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून पोलीस नाईक विलास जाधव सोबत पोलीस नाईक अविनाश चीकराम असे दहेगाव शिवारातील बेंबळा कालव्याचे रस्त्याने पेट्रोलिंग करीत असताना एक ट्रॅक्टर ट्रॉली सह मिळून आला त्यास थांबवून पाहणी केली असता सदर ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास रेती मिळून आली वरून सदर ट्रॅक्टर चालक आकाश दिलीप पानघाटे रा दहेगाव यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले वरून सदर ट्रॅक्टर महिंद्रा मुंडा क्रमांक एम एच 29 एके 14 31 लाल रंगाचा किंमत अंदाजे पाच लाख व ट्रॉली क्रमांक 29 वाय 59 21 व सदर ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास रेती किंमत अंदाजे सहा हजार रुपये असा एकूण पाच लाख सहा हजार चा मुद्देमाल मिळून आला सदर ट्रॅक्टर कोणाचे आहे याबाबत विचारणा केली असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर हे वनिश चरकी घोसले रा दहेगाव यांचे असल्याचे सांगितले. सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून सदरचे ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशन वडकी येथे डिटेन करून ठेवण्यात आले असून सदरची माहिती मा तहसीलदार, राळेगाव, मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली असून पुढील कारवाई तहसील कार्यालय राळेगाव तर्फे करण्याची तजवीज ठेवली आहे.
