हिंगणघाट येथे प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत (मुंबई) यांचा संविधान जागर जलसा कार्यक्रम

हिंगणघाट:-शेतकरी कष्टकरी महिला आणि मध्यम वर्गीय नागरिक यांचा या देशात होणाऱ्या लुटी याकरिता संविधान जागर जलसा कार्यक्रम अतुलभाऊ वांदिले मित्रपरिवार व सर्व सामाजिक परिवर्तनवादी संघटने द्वारा रविवार २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथे संविधान जागर जलसा कार्यक्रम सादर करते प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत (मुंबई) असणार आहेत. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम असणाऱ्या सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या कार्यक्रमाचे स्थळ असून रविवारी २२ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ०६ वाजता हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अतुलभाऊ वांदिले मित्रपरिवार व सर्व सामाजिक संघटना हिंगणघाट यांनी केले आहे..
0