राळेगाव :-
भरधाव वॅगनार कारच्या धडकेत भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक जखमी
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव–वडकी रोडवरील सांवगी पेरका जवळ NH 361 B वर तीहेरी अपघाताची घटना
राळेगाव तालुक्यातील NH 361 B राळेगाव–वडकी रोडवरील सांवगी पेरका गावाजवळ दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये अप. नं. 508/25 अन्वये कलम 281, 125(a), 125(b), 106(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी फिर्यादी निखील तुळशिराम राऊत (वय 34, व्यवसाय – खाजगी शिक्षक, रा. डोंगरगाव, ता. राळेगाव) यांनी राळेगाव पोलीस स्टेशन येथे जबानी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी निखील राऊत हे दिनांक 13/12/2025 रोजी सायंकाळी आपल्या डिझायर कार क्र. MH 49 U 3396 ने राळेगावहून डोंगरगावकडे जात असताना, सांवगी पेरका जवळ NH 361 B वडकी रोडवरून येणारी सिल्वर रंगाची वॅगनार कार क्र. MH 40 AR 4389 ही भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आली. सदर वॅगनार कारच्या चालकाने राळेगावकडून वडकी रोडकडे जाणाऱ्या अँक्टीवा मोपेड क्र. MH 29 AX 4461 ला जोरदार धडक दिली व घटनास्थळावरून पळ काढला.
या धडकेत अँक्टीवावर बसलेले आदित्य दिलीप मरस्कोल्हे (वय 27), गोपाल मडकाम, मोहन लक्ष्मण मेश्राम – तिघेही रा. राळेगाव हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असताना, सोयाबीन भरलेला एक ट्रक वडकी रोडकडे जात असताना थांबला, त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रक क्र. MH 18 BZ 1657 ने त्यास धडक दिली. या दुसऱ्या अपघातात ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.
मी सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालय, राळेगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आदित्य दिलीप मरस्कोल्हे, गोपाल मडकाम व मोहन लक्ष्मण मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर अजय धनगर (रा. धुलिया, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेशकुमार दंदे करीत असून, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक श्री. बंसल, पोलीस निरीक्षक मालते मॅडम, API दांडे व PSI बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. कायम तपासी अधिकारी म्हणून HC/1484 रत्नपाल मोहाडे काम पाहत आहेत.भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालना व पळ काढणाऱ्या आरोपी चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत असून, या भीषण अपघाताने राळेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.