
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर या गावाच्या बाबतीत सांगितले तेवढे थोडेच. या गावातील स्मशान भूमी गावाला लागूनच नाल्यापलिकडे आहे.त्या स्मशानभुमीचे बांधकाम व वालकंपाऊड आणि ताराचे कंपाऊंड मागील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या काळात झालेले आहे. परिसरात सर्वत्र रोडा सिमेंटच्या माध्यमातून फ्लोरिंग केले आहे.परत क़पाऊंडला गेट सुध्दा बसविले आहे.त्यानंतर गावातील दानशूर व्यक्तींनी बसण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बाकडे ठेवले आहे.अशातच या स्मशानभूमीची अवस्था फार बिकट झाली असून त्या स्मशान भुमीजवळ गेल्यानंतर बाहेरच्या बाजूला सर्वत्र समोरून गवत कचऱ्यांनी परिसर वेढला असून स्मशान भुमीत सुध्दा त्या फ्लोरिंगच्या अधे मध्ये गवत उगवले असून परिसरात त्या वाळलेल्या झाडासभोवताली सुध्दा सर्वत्र गवतांने वेढलेला आहे.अशातच रात्री वगैरे त्या स्मशान भुमीत बसायचे कुठे हा प्रश्न सोबत जाणाऱ्या लोकांना पडत असून हा प्रश्न फार गंभीर किंवा जास्त खर्चाचा नसून मात्र अशावेळी सोबत जाणाऱ्यांना सर्प दंश,विंचू चावणे असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अशा प्रश्नाला सत्तेतील पदाधिकारी बांधवांनी गांभीर्याने घेऊन ताबडतोब परिसरातील स्वच्छता करून घ्यावी.त्याचप्रमाणे अशा कामासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि जनता यांच्या मधला दुवा म्हणजे ग्रामसेवक, सचिव यांनी अशा सार्वजनिक कामांना मार्गी लावण्यासाठी सहकार्याची भावना ठेवून कामं मार्गी लावावे.या वरूड गावात अनेक समस्या भेडसावत असून या सर्व समस्यांवर गांभीर्याने विचार करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा वरूड जहांगीर येथील रहिवासी श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
