जि प शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरुन प्रतिसाद…

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

जि प शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच माणिकराव किन्नाके,प्रमूख अतिथी म्हणून दिलीपराव खूळे,प्रशांत लाकडे (उपसरपंच) ,सौ.करिश्माताई किन्नाके (शा.व्य.स.अध्यक्ष)सौ.प्रणालीताई जावलेकर (शा.व्य.स.उपाध्यक्ष) शंकर माहूरे सर (सहायक शिक्षक जिपशाळा दडपापूर) मारोती मारेगामा ,आशाताई विलारी,अनंताभाऊ वाघमारे,लक्ष्मणराव लाकडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विरंगुळा व कलागुणांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच सास्कृतिक कार्यक्रम हा एक भाग आहे….


भारतीय संस्कृतीची परंपरा दर्शवणारी विविध नृत्यगीत विद्यार्थ्यांनी सादर केलीत. गोंडीनृत्य,जेजूरी नृत्य गीत शेतकरी गीत,देशभक्तीपर गीत,भीमगीत,लावणीनृत्य, आदिवासी नृत्यगीत ,ढेमसा या सर्व नृत्यगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनाही बालकलाकारांना बक्षिसाच्या रूपात भरभरुन प्रतिसाद देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडीतील लाकडेताई ,ढालेताई, सहागवरेताई सर्व पालक व समस्त ग्रामस्थांसह जावलेकर मॅम, स्वप्नील कानोडे, सुभाष किन्नाके व महिलां बचतगट यांचेही सहकार्य लाभले…वरील कार्यक्रमास स्टेजची जबाबदारी संजय मुंडाले व संजय जावलेकर आणि अमोल मेसेकार ठेकेदार यांनी पार पाडली बक्षीस यादीकरीता राजू उरकुडे तर फोटो व व्हीडीओ शूटिंसाठी धृप जावलेकर यानी उत्तमकाम केले….
कार्यक्रमाचे संचालन शंकर माहूरे सर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भूमन्ना कसरेवार सरांनी तर आभारप्रदर्शन भगवान ठावरी सरांनी केले.