
डॉ. श्रद्धा जंवजाळ व डॉ.राहुल जंवजाळ यांचे यशस्वी आयोजन.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे संपन्न झालेल्या निरंतर कार्यशाळा (CNE) आणि नर्सिंग पदवीप्रदान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला त्यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नर्सिंग सेवेला “पुण्य कर्म” संबोधून परिचारिकांच्या योगदानाचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र परिचर्या परिषद आणि पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कर्करोग जागरूकता (Cancer Awareness) हा होता यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
🛑कर्करोगाचे लवकर निदान
🛑व्यवस्थापन आणि पुनर्वसन
🛑रुग्णांचे पोषण आणि मानसिक आधार
पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की कोविड काळातील परिचारिकांच्या धैर्याचे प्रचंड कौतुक असून डॉक्टर उपचार करत असले तरी, रुग्णाची खरी सेवा आणि शुश्रूषा परिचारिकाच करतात, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सतीश दोशी म्हणतात की कर्करोगाच्या भीतीपेक्षा सकारात्मक राहणे आणि आनंदी जीवन जगणे उपचारासाठी किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
डॉ. श्रद्धा जवंजाळ (संयोजिका): या कार्यशाळेमुळे परिचारिकांना १० क्रेडिट पॉइंट्स मिळणार असून, व्यापक जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.
🛑कार्यशाळेतील प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते
डॉ. एम. के. इनामदार, डॉ. सतीश दोशी, डॉ. विद्याचंद्र गांधी
( रुबी हॉल क्लिनिक) महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षा डॉ. मनीषा शिंदे, नितीन इंगळे, डॉ. विजया कुंभार आणि विजय महाजनी यांनी मार्गदर्शन केले.
🛑 विशेष उपक्रम
शपथविधी: सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
🛑पत्रकार सन्मान: पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांचा पिंक रेव्होल्यूशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला, CNE निरंतर कार्यशाळा परिचारिकांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारी आणि समाजातील कर्करोगाच्या भीतीला दूर करण्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.
