
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
तालुका अध्यक्षपदी बाबाराव गोरे तर सचिवपदी राजेंद्र टेकाडे यांची निवड
ओबीसी समाजाच्या भागेदारीसाठी शेवटपर्यंत लढा देवू
ओबीसी कर्मचारी बांधवांचा निर्धार
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ, काटोल शाखेचे संघटन करण्यासाठी तालुकांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची सभा गटसाधन केंद्र, काटोल येथे घेण्यात आली.सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी बाबाराव गोरे तर सचिवपदी राजेंद्र टेकाडे त्यांची निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारणी येत्या रविवारला तयार करण्यात येईल.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मांगे तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष जुगलकिशोर बोरकर, उपाध्यक्ष धनराज फरकाडे, विभागीय अध्यक्ष राजू बोचरे,राज्य प्रतिनिधी टेमराज माले प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी, ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले पाहिजे व स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आदी मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघ, काटोलचे गठण करण्याचा निर्णय घेतला आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक राजू धवड , संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन सुनिल वंजारी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सुनिल ठाकरे, विलास काळमेघ,शेषराव टाकळखेडे, निलकंठ मदनकर, मारोती मुरके, रेखाताई मोहोड,महादेव बारई, नरेंद्र बोढाळे, शिवाजी गौरखेडे, मोरेश्वर साबळे, श्रीकृष्ण भोयर, ईश्वरदास भादे,योगेश राऊत,प्रशांत वऱ्हाडे, केशव सोमनाथे, सतिश ढबाले, रविंद्र बारमासे, श्रीधर फुलारे, नंदकिशोर गमे, युवक चर्जन, संदीप टेंभे यांनी परिश्रम घेतले.
