
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने हरभरा खरेदीसाठी २ मार्च २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही नोंदणी ३१ मार्च पर्यंत करता येणार
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्याने हरभरा विक्रीसाठी नाफेड केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन व्यवस्थापक संजय जुमडे व लेखापाल गणेश शिवरकर यांनी केले आहे.
शासनाने हरभऱ्याला ५८७५ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे त्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी १५. ७९ किलो ची मर्यादा निश्चित केली असून शेतकऱ्यांना हरभरा नाफेड केंद्रावर विक्री करायचा अशा शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघ राळेगाव येथे
(१)नोंदणी अर्ज ,
(२)अद्यावत सातबारा सन २०२५-२६ ऑनलाइन चना ई पिक पेरा असलेला (३) आधार कार्ड झेरॉक्स
(४) बँक पासबुक झेरॉक्स व
(५) शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आदी कागदपत्रे घेवून स्वतः हजर राहून थंब व ओटीपी द्यावा लागेल न दिल्यास नोदणी होणार नाही तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार फक्त ए पी क्यू दर्जाचा माल खरेदी करण्यात येणार आहे याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी
