
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दत्तकृपा बहुउदेशीय संस्था व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय तथा अनुसंसाधन केंद्र सालोड (हि)वर्धा यांच्या संयुक्त विधमाने स्वर्गीय मोहित झोटिंग यांच्या स्मृतिदिना निमित्त राळेगाव तालुक्यातील वडकी येथे भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 12 आगस्ट 2021 ला सकाळी 10 वाजता स्थळ डॉ. पु. स.इंगोले सभागृह वडकी येथे घेण्यात येणार आहे.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भाऊ झोटिंग हे दरवर्षी स्व.मोहित झोटिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक जाणीवेतून सामाजिक उपक्रम राबवित असतात. स्व.मोहित यांचे एका आजाराने तरुण वयात चार वर्षांपूर्वी निधन झाले होते आपल्या येकुलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र भाऊ झोटिंग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता.स्व.मोहित झोटिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे,उदघाटक राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रशांतभाऊ तायडे,प्रमुख उपस्थिती राळेगाव चे तहसीलदार डॉ.रवींद्रजी कानडजे, राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांतजी पवार साहेब,प. स. सदस्य प्रविण भाऊ कोकाटे, प. स. सदस्य ज्योतीताई खैरकर,वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव जाधव,सेंट्रल बँक चे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकार वडकीचे सरपंच मोनिकाताई देठे या उपस्थित रहाणार आहे.तरी या शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच युवा तरुणांनी रक्तदान करण्यास समोर यावे असे आवाहन स्व. मोहीत झोटींग मित्रपरीवार व दत्तकृपा संस्थेच्या वतीने केले आहे.
