उद्या होणार मनसे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ , 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग

उद्या सकाळी ११ वा विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर भांदेवाडा येथे नारळ फोडून होईल फॉर्म भरण्यास सुरवात.योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात अनेकांना करिअर घडवता येत नाही. यातच अनेक युवकांना बेरोजगार रहावे लागले असून अनेक युवकांच्या भविष्याचा प्रश्न आपल्यासमोर भेडसावत आहे. मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सुशिक्षित व कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.

देशातील ५० पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनॅन्स, बीफार्मा-नसिंग, डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे ५००० पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा येथे नारळ फोडून उद्या दिनांक २१ सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरुवात होत आहे.
युवकांना ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून उद्या पक्षाच्या वतीने क्यूआर कोड सुद्धा प्रसिद्ध केला जाणार आहे तसेच शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा फॉर्म स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती मनसे च्या वतीने देण्यात आली आहे.