
प्रतिनिधी//शेख रमजान
मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी 1.30 वाजता मौजे पिंपळगाव वन येथे विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे. सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गजानन सुरोसे, ग्राम महसूल अधिकारी पंजाब सानप, ग्राम महसूल सेवक वासुदेव
ज्युकोटवार, ग्राम महसूल सेवक कल्याण सोळंके व वाहन चालक धम्मदीप कांबळे यांनी केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी ट्रॅक्टर उमरखेड येथील तहसील कार्यालयावर लावण्यात आले.
