विज वितरणाच्या निष्काळजीपणा मुळे बैलाचा मृत्यु ,लाईनमन च्या बेजबाबदार, मूजोर वृत्तीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

आष्टोणा गावात गावाच्या सुरूवातीलाच विद्युत रोहित्राची डिपी उघडलेल्या अवस्थेत आहे विज वितरण कंपनी वडकी यांना वारंवार याबाबत तक्रार केल्या तसेच ग्रामपंचायत मार्फत, नागरिकामार्फत बऱ्याच वेळा लेखी तक्रार दिल्या परंतु विज वितरण कंपनी वडकी यांना झोपेतूनच जागच आली नाही, त्यांनी कधीच डीपीची कुठलीही मेंटेनन्स न केल्याने, लक्ष न दिल्याने आज एका गरीब शेतकऱ्याच्या बैलाचा (गोरा) नाहक जीव गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असुन यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आष्टोणा गावाला लाईनमन आहे परंतु तो आठवड्यात फक्त एक ते दोनच दिवस ड्युटीवर दिसतो बाकी दिवस तो १०० किलोमीटर च्याच अंतरावर असतो त्यामुळे संपूर्ण गावात लाईनच्या विषयावर दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी नागरिकांमध्ये बऱ्याच दिवसापासून येत होत्या
आज प्रत्यक्ष ही घटना घडल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली असून त्या कामचुकार आणि मुजोर लाईनमन ला घरी पाठवा अशी नागरिकांची मागणी होत आहे.
दि. १३/०३/२०२३ रोज सोमवार ला युवा शेतकरी प्रशांत पावडे शेतातुन सायंकाळी जनावरे चारून घरी येत असतांना गोठ्या जवळ येऊन त्यांचा बैल (गोरा) बुझाडला आणि गावातच पळून गेला तसेच त्याला पकडण्यासाठी परत गेले असता तो बैल (गोरा) इकडे तिकडे पळू लागला म्हणून त्याला सोडून प्रशांत पावडे हे घरी वापस गेले, आज सकाळीच पहाटे दिनांक १४/०३/२०२३ रोज मंगळवार ला सकाळीच ७ वाजता तो बैल (गोरा) विद्युत रोहितला (डीपीला) चिपकून मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत दिसला.यामुळे शेतकऱ्याचे ४०हजार रुपयांचे नुकसान झाले असुन आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.