सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल सावरखेडा शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हिंदू समाज संघटन, सामाजिक बांधिलकी, युवक प्रबोधन व राष्ट्रसेवेच्या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली आहे.या कार्यक्रमास तेजस अतुल चोपडा (जिल्हा संपर्क प्रमुख), कुणाल केराम (उपजिल्हाध्यक्ष), अमित रामदास कोसरे (तालुका अध्यक्ष), आकाश कोडपे (तालुका उपाध्यक्ष) व रुपेश राठोड (तालुका मंत्री) यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी सावरखेडा शाखेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.यामध्ये रोशन दीपक दुधकोहळे (अध्यक्ष), योगेश मोगरे (उपाध्यक्ष), वैभव वडदे (सचिव), सुरज पापरे (सहसचिव) व तुषार राऊत (कोषाध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच शाखेच्या कार्यकारिणीत ऋतिक तेलंगे, तुषार तेलंगे, रितेश उरकुडे, सुरज मेश्राम, रोशन उरकुडे, समीर कुमरे, अनिकेत दूधकोहळे, प्रशांत हिवरकर, तनमय तेलंगे, प्रज्वल उरकुडे, साहिल दुर्गे, यश उरकुडे, वेदांत उरकुडे, स्वप्नील सिडाम, जीवन कावडे, स्वप्नील तोडासे, संदीप लोणार, अक्षय लोणार, मोहन जुगनारे यांचा समावेश आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटन मजबूत करणे, सामाजिक प्रश्नांवर सक्रिय सहभाग, युवकांमध्ये संस्कार व शिस्त निर्माण करणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. सावरखेडा शाखा गौरक्षक म्हणूनही कार्य करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शाखा उद्घाटनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
