
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन दोन दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.
दोन वैद्यकीय अधिकारी असतांना सुद्धा रुग्णांची तपासणी सि एच ओ ( CHO) कंत्राटी कर्मचारी करीत असतात.
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत वाढोणा बाजार सर्कल मधील 10 ते 15 खेड्यावरील शेतकरी, शेतमजूर, उपचारासाठी येतात पण या आरोग्य केंद्रात इतर कर्मचाऱ्यांन कडून आरोग्य तपासणी केली जात आहे.डॉ असून सुद्धा आमची तपासणी आरोग्य उपचार इतर कर्मचारी का करतातं? असा प्रश्न पेशंटला निर्माण पडला आहे.
वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असतांना सुद्धा रुग्णांन ची तपासणी सि एच ओ (CHO) कर्मचारी करीत आहे. या सुस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांन मुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच दोन्हीही वैद्यकीय अधिकारी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे.
हे अधिकारी आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांन कडून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून घेत असून व इतर कर्मचाऱ्यांशी उद्धट पणे वागतात तुमच्या विरुध्द वरिष्ठा कडे तक्रार करण्यात येईल व तुमची कायमची सुट्टी करण्यात येईल अशा धमक्या वैद्यकीय अधिकाऱ्यांन कडून कर्मचाऱ्यांना मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय अधिकारी हे आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका स्वतः च्या त्यांच्या पर्सनल कामा साठी वापर करत असल्याची माहिती मिळाली आहे. सदर येथील वैद्यकीय अधिकारी शासनाची दिशा भुल तर करत नाही ना ? असा प्रश्न परिसरातील नागरिक करताना दिसत आहे. जे रुग्ण साधारण औषधी उपचाऱ्याने बरे होत असतांना वैद्यकीय अधिकारी रुग्णांना राळेगाव – यवतमाळ येथे रेफर करतात व रुग्णांचे हाल करून गरीब रुग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या वर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या बाबीची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे वाढोना बाजारसह परिसरातील नागरिकांना मध्ये होताना दिसत आहे
वाढोणा बाजार हा आधिवासी परिसर म्हणून ओळखला जातो रोज रुग्ण या प्राथमिक केंद्रात उपचारा साठी तपासणी करण्यासाठी येत असतात परंतु त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा होत नाही कारण इतर कर्मच्याऱ्यांन कडून रुग्णांना तपासणी करून घ्यावी लागत आहे. सदर अशा निष्क्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व प्रा आ केंद्र वाढोणा बा येथुन हकालपट्टी करावी अशी मागणी रिधोरासह परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे
