डॉ. बी. एम. कोकरे यांना जीवनपुर्ती पुरस्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील डॉ. बी. एम. कोकरे यांना तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना निशुल्क योगा शिकविणे व योगाच प्रचार प्रसार करण्यासाठी योग प्रचारक डॉ. बी. एम कोकरे यांना वडकी येथे स्मॉल वंडर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान ज्युनिअर कॉलेज वडकी यांच्या माध्यमातून दरवर्षी समाजहित कार्य करणाऱ्यांसाठी देण्यात येणारा जीवनपुर्ती पुरस्कार देण्यात आला . यावर्षीही २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राळेगाव तालुक्यातील डॉ. भिमराव कोकरे योगाचार्य यांना सुखदेव भोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी, सौ. कलावती कोरडे सरपंच्या ग्रामपंचायत वडकी, सचिव अश्वरोही ग्रामिण व शहरी बहुउद्देशीय संस्था नागपुर, गंभिरराव भोयर सदस्य, अश्वरोही ग्रामिण व शहरी बहुउद्देशीय संस्था नागपुर, प्राचार्या डॉ. मंजुशा सागर स्मॉल वंडर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान ज्युनिअर कॉलेज वडकी
यांच्या हस्ते जीवनपुर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्यामूळे पुरस्कार प्राप्त डॉ. भिमराव कोकरे योगाचार्य यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे…