आदिवासींचे पुढचे आयुष्य अंधारात राहिल:आदिवासी समाजसेवक ,साहित्यिक नामदेव भोसले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)

राळेगाव तालुका सह पांढरकवडा तालुक्यातील आदिवासी व पारधी बेड्यावर नामदेव भोसले यांनी दिली भेट सविस्तर वृत्त असे जिल्हा अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून शासन आले गरीबांच्या दारी हा कार्यक्रम राबविण्यासाठी राळेगाव तालुक्यातील पळसकुंड,उमरविहीर व पांढरकवडा तालुक्यातील उंबरी,वाई गणेश पुर,तेलंगटाकळी अशा दोन्ही तालुक्यातील ६ आदिवासी बेड्यावर जावून शासन आले आपल्या गरीबांच्या दारी हा कार्यक्रम गरीब गरजु शोषित वंचित कुटुंबातील लोकांना अंतोदय रेशनकार्ड जातीचे प्रमाणपत्र मतदान का. तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या हस्ते रेशनकार्ड व जातीचे दाखले वाटप करण्यात आले या वेळी साहित्यिक नामदेव भोसले, यांनी आदिवासी लोकांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून असे सांगितले आहे की.
निर्सगाचे जतन करताना
कलंकित जिवन जगण्यापेक्षा कष्ट मय जिवनाची वाटचाल कधीही चांगली,शिकारी करण्यापेक्षा शिक्षणाचे धडे घरा घरात गीरवा,संताचे व क्रांतिवीराचे विचारधारा समोर ठेवून जिवन घडवा
अन्याथा आदिवासींचे पुढचे आयुष्य अधरात राहिल असे मत साहित्यिक, नामदेव भोसले यांनी वेक्त केले व कार्ड,तहसीलदार, पोलीस निरीक्षक, यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या हास्ते रेशनिंग कार्ड व जातीचे दाखले वाटप करण्यात आले,या वेळी, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक, नामदेव भोसले, उपस्थितीत होते,
तर राळेगावचे तहसीलदार डॉ. रविंद्र कांनडजे, पोलीस निरीक्षक. विनायक जाधव वडकी, तर
पांढरकवडा चे तहसीलदार,रामदास बिजे,पी .एस.आय.गायकवाड,
तलाठी रुयीकर, ग्रामसेवक, वनिष भोसले, संदिप पवार, विनोद पवार, दिलीप भोसले, माला पवार, मयुर चव्हाण, गौरीताई भोसले,मिराताई भोसले व सर्व ग्रामस्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.