
:-
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर
कारंजा:- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा पंधरवड्यात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगे यांच्या हस्ते फिट कापून उद्घाटन करण्यात आले . या वेळी कारंजा तालुक्यातील महिला भिगिनींना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. कोटेवार उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्नगरे यांनी केले तर आभार डॉ. वाघे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला कारंजा तालुक्यातील अनेक महिला व रुग्णालयातील अधिकारी उपस्थित होते.
