
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
खेड्यापाड्यातील लोकांना आजही आपल्या गावापर्यंत सुरक्षित व कमी खर्चात पोहोचवण्याचं काम अव्यहातपणे एसटी करीत आहे एसटी ला आपण लाल परी असे म्हणतो सोबतच एसटीला आपण जीवनदायीनि लाईफ लाईन असेही संबोधतो तेव्हा एसटीने प्रवासी वाहून नेताना जीवनदायीनीचीच भूमिका पार पाडावी असे आव्हान तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे यांनी केले महाराष्ट्र राज्य परिवहनच्या माध्यमातून सडक सुरक्षा जीवन रक्षा हे अभियान सध्या राबवल्या जात आहे याच अनुषंगाने राळेगाव आगारांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष म्हणून राजेश काळे बोलत होते कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक गोविंद उजवणे, अरुण आत्राम ,कैलास हूड,फिरोज , सतीश डाखोरे आदी उपस्थित होते यावेळी फीत कापून राजेश काळे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले राजेश काळे पुढे म्हणाले की राळेगाव आगाराचे उल्लेखनीय काम आहेत काही गोष्टी टाळल्यास मोठ्या प्रमाणात चालक अपघात टाळू शकतात तसेच अपघात टाळण्यामध्ये चालक आणि वाहक या दोघांचीही तितकीच जबाबदारी असते शिवाय एसटीमध्ये जरी कमी प्रवासी प्रवास करत असले तरी एसटीतील प्रवाश्या सोबतच त्यांच्या वर अवलंबून असलेल्या इतर लोकांची ही जबाबदारी ओळखून एसटी चालवताना एसटी चालवावि कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक उजवने यांनी केले त्यांनी एसटीच्या या उपक्रमाबद्दल चालक वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली सोबतच अपघात टाळण्यासंबंधी विविध उपाय योजना उपस्थितना समजावून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डाखोरे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास हुड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला
