
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा च्या वतीने ज्वलंत मागण्यांना घेऊन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन दिनांक २३ जानेवारी २०२६ रोज शुक्रवार दुपारी १२वाजता करण्यात आलेले आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व सदानंद इलमे मुख्य संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती ,रोशन जांभुळकर जिल्हाध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती ,अजबराव चिचामे ,गोपाल सेलोकर, डॉ.बाळकृष्ण सार्वे ,रोशन उरकुडे, प्रतिभाताई पेंदाम ,रमेश शहारे यांच्या नेतृत्वात करण्यात करणार आहेत. सदर धरणे आंदोलनात राज्य सरकारकडून२९ डिसेंबर २०२५ रोजी निघालेल्या पत्रात राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करावयाच्या यादीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करण्यात यावा ,भंडारा नगर पंचायत वार्ड क्रमांक ३ मध्ये मतमोजणी दरम्यान उमेदवाराचे नावच ईव्हीएम मशीन मधून गहाळ झाले ह्या गंभीर प्रकरणात दोशी असलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ निर्गमित करण्यात यावे व वार्ड क्रमांक तीन चे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची नव्याने बायलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी ,रमाई आवास योजना व शबरी आवास योजना पूर्ववत सुरू करण्यात येऊन ५ लाख रुपये पर्यंतचे घरकुलास अनुदान देण्यात यावे, भंडारा जिल्ह्यात सन २०२४ -२५ या वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत गाई म्हशीचे वाटप करण्यात आले लाभार्थ्यांना अर्ध्या किमतीत म्हातारे व निरुपयोगी जनावरे घेऊन देणाऱ्या पुरवठादारावर व पशुधन विकास अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पुरवठादार रद्द करून लाभार्थ्यांना त्यांच्या मर्जीने जनावर घेण्याची मुभा देण्यात यावी ,तालुकास्तरावर ओबीसी मुला मुलींचे निवासी वसतिगृह सुरू करण्यात यावे ,चंद्रपूर जिल्ह्यातील मित्तूर गावाचे रोशन कुडे यांनी सावकारी कर्जापोटी स्वतःची किडनी विकली बरेच शेतकरी सावकारी कर्जाच्या अडकले आहेत अशा शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जापोटी आपल्या शरीराचे अवयव विकू नयेत म्हणून शेतकरी कर्जमाफी करते वेळेस सावकारी कर्ज सुद्धा माफ करावे, आदिवासी आश्रम शाळेत रिक्त शिक्षकांचे पदे तात्काळ भरण्यात यावेत, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ देण्यात यावेत ,या मागण्यांकरिता वरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे,जिल्हा सचिव आसित बागडे, जिल्हा कोषाध्यक्ष इंजिनियर रूपचंद रामटेके ,निमंत्रक भगीरथ धोटे ,युवराज उके ,वामनराव गोंधळे, अमृत बनसोड, प्राध्यापक सुरेश खोब्रागडे ,विजय भोवते, ग्यानचंद जांभुळकर ,राजेश मडामे , अशोक उईके, बंडू फुलझेले,श्रीकृष्ण पडोळे, दिलीप वानखेडे ,दीपक गजभिये ,अरुण जंजाळ, के झेड शेंडे, अंजली बांते ,सुभद्रा झंझाड, हंसराज वैद्य, श्रीराम बोरकर, प्रभाकर वैरागडे, दुर्योधनत अतकरी ,अरुण तुपे ,सदानंद रंगारी ,पंजाबराव कारेमोरे ,मोरेश्वर तिजारे ,संजीव भांबोरे, दिलीप ढगे, रामलाल बोपचे ,रामभाऊ रणदिवे ,विश्वनाथ नंदागवळी, डॉ.रवींद्र जनबंधू ,व्ही डब्लू भाऊ ते रणजीत कोलटकर ,सुरेश खंगार, ज्योतिबामलवडे ,शामला कोहपरे ,सौ रंजना बागडे , जोशना गजभिये ,छाया राऊत ,पूजा पाटील ,मनीषा भांडारकर, मनोहर मेश्राम, होमराज काशिनाथ हत्तीमारे, दिनेश टेंभुर्णे, डॉक्टर शंकर कठाणे ,यांनी केलेली आहे.
