वणी पोलीस ठाण्याचा कारभार राम भरोसे

वणी :- येथील पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी आपसात मारहाण केल्याने पोलिसांची उरली सुरली प्रतिमा पूर्णतः वेशीला टांगली गेली आहे. यातील पोलीस हवालदार धीरज चव्हाण यांच्या अरेरावी धोरणाची तक्रार सहा महिन्यांच्या अगोदरच केली होती त्यावर तेव्हाच सक्त कार्यवाही ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी केली असती तर आज वणी पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली नसती अशी चर्चा संपूर्ण शहरात ऐकायला मिळत आहे.

    

पांढरकवडा येथून बदलून वणीच्या पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस हवालदार धीरज चव्हाण हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत होते. स्टेशन डायरीवरचे काम असो की इतर कोणतेही काम असो कर्तव्यावर असतानाही नशापाणी करून असायचे नशा पाणी करून कर्तव्य बजावणे म्हणजे आपल्या कर्त्याव्यात कसूर करण्यासारखे आहे. स्टेशन डायरी सांभाळत असते वेळी जर एखादा नागरिक तक्रार नोंदविण्यास आला तर तो त्यांचे सोबत हुज्जत घालून त्यांनाच धाकपडत कारीत असायचा किव्हा चक्क मारायला पण जायचा असा बेजबदरीचा हवालदार असताना देखील ठाणेदार त्यांची पाठराखण का करीत होते हे न समजणारे कोडे आहे. मागील सहा महिन्यातील चव्हाण यांच्या स्टेशन डायरीवरील कर्तव्य बाजण्यात येत असलेले पोलीस स्टेशन मधील असलेले सीसीटीव्हीचे चित्रीकरणाची चौकशी केली तर पूर्ण चित्र स्पष्ट होतील. परंतु ते कार्य करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचे हात धजवणार नाही कारण धीरज चव्हाण हा पांढरकवड्यातून वणीत आलेला आहे. त्यामुळे अधिकारी व हवालदाराचे ऋणानुबंध जुडलेले आहे. एक साधा हवालदार असून ठाणेदाराच्या ऐटीत राहायला त्याला आवडत होते. आपल्या पेक्षा कोण व्यक्ती पदाने मोठा आहे त्याची त्याला जानच दिसून येत नव्हती. कोणी ही कर्मचारी किव्हा पीएसआय कर्मचारी त्याची तक्रार करीत नव्हते कारण साहेब त्याच्या जवळचे होते. साहेबाना कोणीही चव्हाण यांची केलेली तक्रार चालत नव्हती. म्हणून एक हवालदार (नायक) असलेला धीरज चव्हाण यांची प्रचंड अरेरावी वाढली होती. आणि याच अरेरावीत ता. २९ च्या रात्री कर्तव्य बजावत असताना पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांच्याशी वाद होऊन फुल फिल्मी स्टाईल हाणामारी झाली यात पीएसआय टिपूर्णे यांच्या हाताची दोन बोटे फॅक्चर झाली तर धीरज चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. या घडलेल्या प्रकाराने वणी पोलिसांची उरली सुरली प्रतिमा पूर्णपणे वेशीला टांगल्यागेल्याने वरिष्ठ पोलीस खडबडून जागे झाले या प्रकरणाची चौकशी पोलीस उपाधीक्ष संजय पूजलवार यांचे कडे सोपवली त्यांची सर्व प्रकारची चौकशी केली सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण बघितले व तात्काळ दोघानाही निलंबित करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे कडे पाठवला असता चक्क पोलीस अधीक्षक भुजबळ हे रात्री उशिरा का होईना वणीत दाखल होईन दोन्ही दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली. या कार्यवाहिने पोलीस वर्तुळात आनंद जरी होत असला तरी वणीतील सर्व सामान्य जनमानसात एकच प्रश्न उद्धभावला आहे की अश्या हवलदाराची पाठराखण करणाऱ्या ठाणेदारावर पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक का पाठराखण करीत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. पीएसआय व हवालदार दोघेही चिडखोरच

साहेबांच्या मर्जीतील हवालदार धीरज चव्हाण हे चिडखोर व नागरिकांसोबत हुज्जत घालणारे होतेच त्याच बरोबर अंगावर खाकी वर्दी लावून नशपणी करून कायद्याची पायमल्ली करणारे होतेच पण पीएसआय शिवाजी टिपूर्णे देखील नेहमी चीड चीड करणारेच होते व अनेक गुन्ह्यातील गिन्हेगारणा खाकीचा रुबाब दाखवून हात ओले करणारेच होते अश्या अनेक चर्चेला आता उत आला आहे. घडलेल्या दोघांच्या बाचाबाचीतील रूपांतर जोरदार मारहानित झाली व दोघेही गंभीर दुखापत ग्रस्त झाले आहे. यात सुदैवाने जीवित हानी टळली आहे. या संपूर्ण प्रकाराला साहेबांच्या मर्जीतील कर्मचार्यांची वाढलेली मक्केदारी आहे असे बोलल्या जात आहे.

सहा महिन्यांपूर्वी कोणी दिली होती चव्हाण यांची तक्रार मागील सहा ते सात महिण्यागोदर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग हे एका व्यक्तीच्या समस्या घेऊन पोलीस स्टेशनला ला गेले असता स्टेशन डायरीवरील धीरज चव्हाण यांनी मंगल तेलंग यांना अर्वाछ भाषेचा वापर करून शिवीगाळ केली होती. या प्रकाराची रीतसर तक्रार तेलंग यांनी केली असता त्यावर नाममात्र चौकशी करून ठाणेदार यांनी कार्यवाही प्रलंबित ठेवली आहे. त्यावेळी उचित कार्यवाही झाली असती तर आज वणीच्या पोलिसांच्या अब्रूची लत्कारे संपूर्ण महाराष्ट्रात लटकली नसती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ उचित पाऊल उचलावी अशी मागणी वंचित ने केली आहे.