राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार रिधोरा गावाला

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल अखिल भारतीय गुरूदेव सेवा भजन मंडळ यांना राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सविस्तर वृत्त असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धा शनिवार दि. १९ नोव्हेंबर ते मंगळवार २२ नोव्हेंबर पर्यंत स्थळ : प्रार्थना मंदिर पोलिस स्टेशन रोड भवानी वार्ड अल्लीपुर ( शिवपुर) ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे शहरी व ग्रामीण भागातील पुरूष, महिला व बाल गोपाल यांच्या साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर या भजन स्पर्धेत राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल अखिल भारतीय गुरूदेव सेवा भजन मंडळ यांनी भाग घेवून ११ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळविले आहे. सदर राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने अखिल भारतीय गुरूदेव सेवा भजन मंडळ रिधोरा यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहे.