आदिवासी गोंड गोवारी जमातीचा सार्वजनिक ढाल उत्सव यवतमाळ जिल्ह्यात साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आदिवासी गोंडीयन संस्कृतीचा एक भाग म्हणून गोंड जमातीची उपजमात असलेली गोंड गोवारी (गोवारी )जमात ही विदर्भातील ११ जिल्ह्यात वास्तव्यास आहे.
ही जमाती गोंडीयन संस्कृती मधील अविभाज्य घटक असून परंपरागत गोंडीयन संस्कृतीशी एकरूप आहे.गोंड गोवारी जमातीचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी च्या पाडव्याला गाय गोधन च्या दिवशी सार्वजनिक ढाल पूजन आहे. ढाल ही दोन प्रकारची असते त्यात दोन मुखी ढाल म्हणजे गोंडी धर्माचे संस्थापक धर्मगुरू पहांदी पारीकुपार लिंगो यांच्या प्रतिकात तर चारमुखी ढाल धर्ममाता रायताड जंगो ह्यांच्या
प्रतीकात अश्वीन दश्मीला काटसावरीचे झाडाची फांदी विधिवत घरी आणून ढाली सोबत उभी केली जाते.गोंडी धर्माचे संस्थापक धर्मगुरू पहांदी पारीकुपार लिंगो यांनी बारा हजार वर्षांपूर्वी कोईली कचारगड, सालेकसा जिल्हा गोंदिया या ठिकाणी काटसावरीच्या झाडाखाली सात वर्षे तपस्या करून त्याच झाडाखाली महान अशा वैज्ञानिक गोंडी धर्माची स्थापना केली.म्हणून काटसावरीच्या झाडाला गोंड गोवारी जमातीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.कारण या झाडाची फांदी आजही धर्मगुरू पहांदी पारीकुपार लिंगो व धर्ममाता रायताड़ जंगो च्या प्रतिकात ढालीच्या रुपात पुजल्या जाते म्हणजेच ते आमचे पुर्वज/पुरखे असल्याचे सिद्ध होते.
दिवाळी च्या पाडव्याला गाय गोधन च्या दिवशी गावातील जमातीचे लोक एकत्र जमून सार्वजनीक रुपात ढाली ची वाजत गाजत मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते व जमातीचे घरोघरी जाऊन अआगदा घेतला जातो. गोंड गोवारी जमातीच्या घरात ही परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे ढाल ही दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी आतापल्या गावात सजवून डफ पावलं व बासरीच्या निनादत वाजत गाजत हा साजरा केला जातो हा उत्सव विदर्भा सह यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्यक् गावागावात साजरा केला जातो ह्याच ढालीची संस्कृती मा, सुप्रीम कोर्टाने अॕंन्थ्रॉपॉलॉजीकल सर्व्हे आॕफ इंडिया द शेड्युल्ड ट्राईब, के.एस.सिंग या ग्रंथाचा संदर्भ देत १८/१२/२०२० च्या निर्णयात पॅरा. नं.८३ वर आदिम गोंड गोवारी (गोवारी ) जमातीच्या ढाल पूजन, वाघोबा, नागोबा पूजन करणारे व विशिष्ट चालीरीती पाळणाऱ्या गोवारी जमातीचा भारताच्या अनुसूचित जमातीचे यादीत गोंड गोवारी नोंद आल्याचे नमूद केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बहुल संख्येने गोंड गोवारी जमात मोठ्या प्रमाणात हे उत्सव साजरा करतात.
यात प्रामुख्याने यवतमाळ,राळेगाव, कळंब, बाभुळगाव, आर्णी, वणी, मारेगांव,घाटंजी,केळापूर,नेर, दारव्हा,दिग्रस तालुक्यासह सर्व जिल्ह्यात ही जमात वास्तव्यास आहे.महाराष्ट्राचे अनुसूचित जमातीचे यादीत गोवारी जमातीची नोंद घटनात्मक प्रकरीयेतून गोंड गोवारी अशी आलेली असतांनाही ही जमात दीर्घकाळापासून आपल्या संविधानिक अस्तित्वाच्या हक्का पासून वंचित आहे. या जमातीचे नागपूर येथे एक वर्षांपासून न्याय हक्कासाठी मोर्चा उपोषण झाले पण राज्यसरकारने ह्या जमातीला न्याय न दिल्यामुळे ही जमाती राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार सुद्धा जाहीर केला आहे
अशी माहीती आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक संघर्ष कृती समितीच्या कार्यकारी संयोजक सचिन चचाने, राज्य सचिव रामदास नेवारे राजेश नागोसे, हरिभाऊ सहारे, मोतीराम शेंद्रे, राम शेंद्रे यांनी दिली आहे.