
नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोर्चा
हिंगणघाट:- १० ऑक्टोबर २०२३
०२ ऑक्टोंबरला साईकृपा जिनिंग आजंतीमध्ये रामकृष्ण पुरुषोत्तम भजगवळी राहणार मुजुमदार वार्ड हिंगणघाट हा हमालीचे काम करताना साईकृपा जिनिंग आजंती येथे कंपनीमध्येच मरण पावला व त्या कंपनी ममाका कडून परिवाराला कुठलीही मदत करण्यात आली नसुन त्यासंबंधी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे कंपनी मालका सोबत परिवारातील लोकांची व कामगारांची बैठक लावून त्याच्या परिवाराला कंपनीकडून २५ लाख रुपयाचे मदत देण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी वर्धा, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट तसेच ठाणेदार हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. व कंपनी मालकासोबत बैठक लावून मदत करण्यासंबंधी तहसीलदार यांनी आश्वासन दिले त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित शकील अहमद, संचालक कृषि.उ.बा.स.हिं संजय कात्रे, तेजस तडस, पप्पू आष्टीकर,अमोल त्रिपाठी,युवराज माऊस्कर,पवन काकडे उपस्थित होते.
दोन ऑक्टोंबरला रामकृष्ण पुरुषोत्तम भजगवळी वय ३६ हे साईकृपा जिनिंग आजंती मध्ये हमालीचे काम करताना दुपारी एक ते दीडच्या वाजताच्या दरम्यान कंपनीमध्ये मरण पावले यासंबंधी कुटुंबीयांनी व कामगारांनी नगरसेवक सौरभ तिमांडे यांची भेट घेऊन कंपनी मालकाकडून कुठल्याही प्रकारची मदत न केल्याबाबत संपूर्ण माहिती दिली.
शंकर महेंद व इतर हमाल त्यावेळेस जिनिंग मध्ये हजर होते साईकृपा जिनिंगचे मालक स्वतः गाडी चालवत सरकारी दवाखाना हिंगणघाट मध्ये रामकृष्ण भजगावली याला आणले असतात डॉक्टरने त्याला मृत असल्याचे घोषित केले.
रामकृष्ण भजगवळी हा हमालीचे काम करीत असताना साईकृपा जिनिंग आजंतीमध्ये जागेवर मरण पावला त्याचे वय ३६ वर्षाचे असून पत्नी एक मुलगा दोन मुली आहेत त्यांचे राहणे मुजुमदार वार्डातील झोपडपट्टीत असून परिस्थिती हलाकीची आहे.
तरी त्याच्या कुटुंबातील कर्ताधरता प्रमुख व्यक्ती मरण पावल्याने पुढील भविष्याच्या उदरनिर्वाह करिता साईकृपा जिनिंगच्या मालकाकडून २५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी तसेच त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक सौरभ तिमांडे सह कामगारांनी मोर्चा कडून निवेदनाव्दारे केली आहे.
त्यावेळी कामगार श्रीकृष्ण मेश्राम, अनिल मैद,शितल पराते, रोहन कोल्हे ,गजू पंधरे, दत्तू भोयर,शंकर मैंद,अमोल बाकरे, शेख रफिक,दादाराव भुरडकर, अविनाश चव्हाण,आकाश कोहळे, सचिन बावणे, सोनू मुंगले, सुरेंद्र वानखेडे, संजय दोडके,रवींद्र बावणे,गोलू राऊत, सुभाष जगदाले, अरुण नगराळे, राहुल एलगंडवार इत्यादी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
