
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सध्या खरीप हंगामात खतांच्या टंचाईमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना राळेगाव तालुक्यात युरियाची उपलब्धता असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती माजी सभापती प्रशांत तायडे यांनी दिली. लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन व संबंधित गोडाऊन व्यवस्थापनाला सूचना करण्यात आल्या आहेत. युरिया वितरणात कुठलीही अडचण आली, तर शेतकऱ्यांच्या हक्काचे खत उपलब्ध करून देण्यासाठी गोडाऊन फोडण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना दिलासा देत तायडे म्हणाले की, “शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला खतासाठी भटकंती करावी लागू नये. तालुक्यात युरिया उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धास्त राहावे.” यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक खत वेळेत मिळेल, असे आमच्या वृत्तपत्राद्वारे सांगितले.
