
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी.
१२ ऑक्टोबर रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढाणकी शाखेचा शस्त्र पूजन विजयादशमीचा उत्सव शहरात संपन्न झाला.
हिंदुत्व हे सर्वतोपरी सामावून घेणारे मूल वचन असून हिंदुत्वाचा मंत्र हा एकत्त्वाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या दहा दशकांपासून याच विश्वासावर काम करीत आहे.संस्कार आणि सामाजिक कर्तव्य हेच संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतात असे प्रतिपादन मुख्य अतिथी संजय श्रीधरराव दंडे म्हणाले. ते ढाणकी येथील गुलाबसिंह ठाकुर शाळेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उत्तमराव साहेबराव शिरगरे सेवानिवृत्त सैनिक हे लाभले होते. ते म्हणाले देशाचे व आपल्या मातृभूमीचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून युवा पिढीने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.एक व्यसन सात पिढीचे नुकसान करू शकते. हिंदू धर्म हा शांतीदूत असून तो कधीही स्वतःहून अन्याय करत नाही अन्याय झाला तरी तो शांतिदूत पाठवतो हे रामायणा मधून श्रीराम प्रभु यांनी दाखवून दिले. जगात एक अदृश्य शक्ती असून ती शक्ती ईश्वर अध्यात्म होय असे यावेळी शिरगरे म्हणाले. तत्पूर्वी प्रमुख व्यक्तींनी शस्त्रपूजन केले स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. वैयक्तिक गीत संजय प्रभाकर देवधर यांनी सादर केले.
शहरातील मुख्य हनुमान मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने पथसंचलन करण्यात आले होते. माता भगिनींनी या वेळेस ठिकठिकाणी रस्त्यावर सडा रांगोळ्या काढून या संचलनाचे स्वागत केले. काही ठिकाणी फटाक्यांची आतिश बाजी सुद्धा ऐकायला आली. अभूतपूर्व शिस्त यावेळी दिसली. युवकांचा व बालस्वयंसेवकांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. दैनिक शाखेतून अत्यंत गुणवान चरित्र संपन्न स्वयंसेवक जन्माला आले. त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले असून ते कधीही संस्काराच्या बाहेर जाऊन वागत नाही हे यावेळी प्रकर्षाने ते त्यांच्या स्वयंशिस्तीतून दिसले. सात चिरंजीवांपैकी एक असलेले श्री हनुमंतरायांनी आपली भक्ती ही हृदयात आहे असेच दाखविले. तसेच स्वयंसेवकाचे आचार विचार हे संघाच्या शिकवणीत कायमच गुरफटलेले राहिले. महारुद्र विष्णू बीबेकर(खंड कार्यवाह), राहुल ज्ञानदीप सोनटक्के,(मंडल कार्यवाह), यांच्या सह रुपेश कोडगिरवार, सुनील मांजरे,प्रशांत जोशी,आनंद येरावार, उमेश कुंभारे, अभिजीत चंद्रे, पिंटू तोडकर, नचिकेत जोशी,सचिन कारंजकर, योगेश चापके, गजानन चापके, साहेबराव लकडे, हिम्मत धवणे, परमेश्वर बल्लेवार.अनेक संघप्रेमी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
