
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री महेन्द्र वेरूळकर सर यांच्या आदेशानुसार राळेगाव शाखेची कार्यकारिणी दिनांक 9/9/2023 रोज शनिवारी श्री व्ही.एस. माकोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली श्री राजेंद्र कोल्हे सर यांच्या उपस्थितीत खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी लक्ष्मण काटकर सर,तर सचिवपदी हरिदास वैरागडे यांची एकमताने निवड करण्यात आली असून खालील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष जे.जी. काळे सर, उपाध्यक्ष महेंद्र कौरती सर, उपाध्यक्षपदी जे.एम.ठाकरे सर, प्रसिद्ध सचिव संदीप कचवे सर, कोषाध्यक्ष राहूल तिजारे सर, महिला प्रतिनिधी जया वाघमारे , आकांक्षा निनगुणकर,संघटक नंदकिशोर फुटाणे सर, जिल्हा प्रतिनिधी सोनाली बरडे, प्रमुख सल्लागार व्ही.एस. माकोडे व आर.एस. कोल्हे सर यांची निवड करण्यात आली असून या संघटना निवडीमुळे शिक्षक बंधू भगिनींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
