
बिटरगांव (बु) प्रतिनिधी//शेख रमजान
बिटरगांव (बु)पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक भागातून अवैध रेती तस्करी ही राजरोसपणे सुरूच आहे . पोलीस प्रशासन व महसूल विभाग मात्र या अवैध रेती तस्करी रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेला दिसून येत आहे . पिंपळगाव (वन) पेंदा, जेवली, ढाणकी या भागातून अवैध रेती तस्करी ही सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन व महसूल विभाग तोंडावर बोट व हाताची घडी याप्रमाणे भत्ते घेऊन गप्प आहे. पत्रकारांनी प्रसार माध्यमांमध्ये कितीही बातम्या लावा त्यातून आम्हाला काही फरक पडत नाही. अशी भूमिका रेती तस्कराची झालेली आहे. प्रसार माध्यमात दोन-तीन दिवस बातम्या पडतात व त्यानंतर प्रशासन थातुर मातुर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे प्रसार माध्यमात कितीही बातम्या लावा यांच्यावर काहीही फरक पडलेला दिसून येत नाही. पत्रकाराच्या बाबतीत असेच झाले आहे ‘तू कर वटवट मी राहतो रामधट ‘ तुम्ही कितीही बातम्या लावा परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहतो. असे प्रशासनाचे व रेती तस्करांचे झाले आहे. बऱ्याच वेळेस रेती तस्करीच्या बातम्या लावल्यानंतर पत्रकारांना धमकीच्या स्वरूपाचे फोन येतात. तसेच पत्रकारांवर भ्याड हल्ले सुद्धा केले जातात. असे झाल्यास यास दुसरे तिसरे कोणी नसून पोलीस प्रशासन व महसूल विभाग जबाबदार राहील तसेच अवैध रेती तस्करी बंद करण्यात यावी .तसेच संबंधित प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटना उपोषणाला बसेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना प्रेस संपादक पत्रकार संघातर्फे देण्यात आले.
