
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अमरावती विभागाच्या विधानपरिषद/ शिक्षक आमदारकीच्या निवडणूका येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने अनेक संघटना अनेक उमेदवार आता पासूनच प्रचाराला लागले असून आपापल्या पद्धतीने प्रचार पध्दती अवलंबत असतांनाच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सुध्दा श्री दिलीप भिमरावजी कडू सरांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.या निमित्ताने उमेदवार कडू सरांचा आज राळेगाव तालुक्यातील प्रचार दौरा एक चांगलाच वेग घेऊन असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप भिमरावजी कडू सरांनी दिनांक 3/2/2026 रोजी राळेगाव तालुक्यातील बापूसाहेब देशमुख विद्यालय जळका, प्रतिभा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळका, गाडगेबाबा विद्यालय अंतरगाव, ज्ञानेश्वर विद्यालय धानोरा,सोनामाता विद्यालय चंहाद, सर्वोदय विद्यालय रिधोरा,नंदुरकर प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा सावरखेड,शांतादेवी कोळसे विद्यालय सावरखेड, गुरूदेव विद्या मंदिर वरध, आदिवासी आश्रमशाळा खैरगाव कासार यांच्या सह अनेक शाळांमध्ये जाऊन शिक्षकांच्या भेटी घेऊन समस्या, मागण्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना पसंती क्रमांक एकचे मतदान देऊन विजयी करण्याची विनंती केली.त्यावेळी त्यांच्या सोबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राळेगाव तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते श्री तातेश्वर पिसे सर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री श्रावणसिंग वडते सर, न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विजय कचरे सर, राज्य शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा सचिव श्री नितीन जुनूनकर सर, राळेगाव तालुका अध्यक्ष राकेश नक्षिणे सर,श्री अमोल शेरकी सर,श्री प्रविण कारेकर सर यांच्या सह अनेक मान्यवर, पदाधिकारी व आजिवन सदस्य उपस्थित होते.त्यावेळी प्रत्येक शाळेत उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
