
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिनांक 11 जून 2026 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजिपी ४५११ यवतमाळ जिल्हा संघटनेची बैठक संघटना कार्यालय यवतमाळ येथे संघटनेचे संस्थापक राज्य सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष गिरीश दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय महाअधिवेशना विषयी चर्चा करण्यात आली. सभेत बोलताना जिल्हा उपाध्यक्ष सतीश पेंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विवीध प्रलंबीत मागण्या मान्य करण्यासाठी व संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजीत करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजिपी ४५११ संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार मा. श्री. बच्चु कडू साहेब तसेच संस्थापक मा. श्री. गिरीश दाभाडकर, राज्य कार्य अध्यक्ष काझी साहेब यांच्या अहवाल नुसार छत्रपती संभाजीनगर मधील आदिती लॉन्स लाडगाव येथे शनिवारी दि.20/06/2026 ला दुपारी 02:00 वाजता होणाऱ्या या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , आमदार तथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बच्चुभाऊ कडू , युनियनचे संस्थापक राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर आणि राज्य कार्याध्यक्ष काझी अल्लादिन उपस्थित राहतील. या अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. सदर राज्यस्तरीय महाअधिवेशनात यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीतून यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सतीश पेंदे यांच्या कडून जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना करण्यात आले. यावेळी बैठकीस यवतमाळ जिल्हा सचिव स्वप्नील बेलखेडे , जिल्हा सहसचिव विशाल सूर्यवंशी , पूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्ष सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
