ढाणकी शहरातील श्रीराम योगा ग्रुप यांनी आयोजित केलेल्या सुदर्शन क्रिया आनंद अनुभूती शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरात श्रीराम योगा ग्रुप द्वारा दिनांक १८ ते २३ असे एकूण सहा दिवस आनंद अनुभूती शिबिराचे सकाळी ५:३० ते ८:३०अशा वेळेत आयोजन केले होते त्याच शिबिराचे आज रोजी २३ जुलै रविवारला समारोपाचा कार्यक्रम आर्यवैश्य भवन येथे आयोजित केला होता यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे डायनामिक सीनियर प्रशिक्षक संजय गाडेकर यांनी सतत ६ दिवस उपस्थित राहून १२०शिबिराचा लाभ घेत असलेल्या शिबिरार्थींना मार्गदर्शन केले यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण केल्यास मनुष्याला कसा लाभ होतो या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले हल्ली आपण बघतोच आहे प्रत्येक क्षेत्र हे धावपळीचे झाले असून आपले मन आणि चित्त की ज्यामधून आपल्याला वेळोवेळी ऊर्जा मिळते ते मण आणि चित्त तणावमुक्त असणे जरुरी आहे जर याच बाबी थकलेल्या स्वरूपात असेल तर नकारात्मक बाबीचा जीवनात प्रवेश होऊन मनुष्य अधोगतीकडे जातो तसेच प्रत्येक व्याधीवर पॅथीचा किंवा उपचार करून ते ठीक होत नाहीत तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बाबीचा व विचारांचा भरणा करून झालेल्या व्याधीवर उपचार मिळू शकतो ते म्हणजे आनंद अनुभूती शिबिरामधून यावेळी त्यांनी लहान मुलांना चेतनाद्वारे विविध प्रकारचे ज्ञानप्राप्ती होते याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले तसेच दीग्रस येथून यशवंतराव राऊत व त्यांचा सोहम नावाचा अवघ्या काही वर्षाचा चिमुकला आला होता त्या चिमुकल्याच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर त्याला एक चलनातील नोट दिल्यानंतर त्या नोटेचे मूल्य किती व त्या चलनाचा क्रमांक अगदी अचूक व तेवढ्याच आत्मविश्वासाने अचूक सांगत होता त्यामुळे उपस्थितांचे मने या चिमुकल्याने जिंकली यावेळी संजय गाडेकर म्हणाले ज्ञानेंद्रियाने जरी आभासी ज्ञान प्राप्त होते पण जोपर्यंत एक आतून आत्मविश्वासाचा संकेत येऊन त्यावर ठाम राहून जीवनात यश मिळवायचे सामर्थ्य हे या शिबिरामधून प्राप्त होऊ शकते तसेच या शिबिरामधून विविध क्रियेमधून रोगप्रतिकारक शक्तीची वृद्धी होते त्यातीलच एक क्रिया म्हणजे सुदर्शन क्रिया होय असेही यावेळी मान्यवर म्हणाले यावेळी या कार्यक्रमाला ढाणकी शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल बिटरगाव (बु) पोलीस स्टेशनच्या प्रथमच महिला ठाणेदार असलेल्या सुजाता बनसोड, अमोल तुपेकर टेंभेश्वर नगर येथील दत्त मंदिरांचे श्रीकृष्ण महाराज, यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे फुलेवार सर यांनी केले होते या कार्यक्रमासाठी निलेश कोडगिरवार, निलेश येरावार, आणि वैभव येरावार व जय श्रीराम योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अतोनात परिश्रम घेतले