
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम स्वराज्य महामंच च्या ” गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा ” ह्या ग्राम संवाद यात्रा मध्ये गावातील लोकांनी गावच्या समस्या मांडण्यासाठी मोठा सहभाग नोंदविला होता राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये १)घरकुल योजना बांधकाम अजून ही समस्या प्रलंबित आहे २) गावातील रस्ते पांदन रस्ते अपुर्ण आहे ३) लोक सहभागातून लोक काम करण्यासाठी तयार आहे परंतु लोक प्रतिनिधी चे दुर्लक्ष होत आहे ४) अनेक गावांमध्ये शासकीय सुविधा पोहचल्या नाही
ग्राम संवाद यात्रा मध्ये गावातील लोकांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत होता लोकांना मार्गदर्शन मिळत होते म्हणून गावकऱ्यांनी मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी यांचा सन्मान आणि कौतुक करुन असा ग्राम संवाद कार्यक्रम लोकप्रतिनिधी घेतला पाहिजे असे मत अंतरगाव चे सरपंच मा प्रविण जी येंबडवार यांनी व्यक्त केले आहे उमेद मध्ये सहभागी असनारी महिला बचत गट उद्योग सखी यांनी सुध्दा ग्राम संवाद यात्रा चे अभिनंदन केले
आज अंतरगाव येथे ग्राम संवाद यात्रा ची समाप्ती करताना कार्यक्रम चे अध्यक्ष सरपंच मा.प्रविणजी येंबडवार मा.मधुसुदनजी कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ श्रीमती आशाताई काळे जिजाऊ ब्रिगेड यवतमाळ मा अशोकराव कारमोरे, दत्ताजी मरस्कोले, रितेशजी वनकर संगणक परिचालक श्रीमती सुनीताताई तोमर, ग्राम पंचायत सदस्य सौ कविताताई पेंदोर, सदस्य जयाताई ठाकरे, सदस्य वैशालीताई नागोसे सदस्य ज्योतीताई नेहारे, बबनरावजी ढाले, राजेशजी बेलखेडे, ज्योतीताई ढाले, छायाताई कापसे, कवडुजी पाल, रामभाऊ वगारहांडे नितीनजी ठाकरे सर्व अंतरगाव ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रम चे सुत्र संचालन श्रीमती सुनिता तोमर यांनी केले आणि मा.बबनराव ढाले यांनी आभार मानलेक
