
माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव
सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते विजय पाटील यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.
स्थानिक पातळीवर रुग्ण कल्याण समिती,शाळा व्यवस्थापन समितीचे यशस्वी रित्या आपली कारकीर्द पार पाडून फुलसावंगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात मोलाची भूमिकात बजावणारे विजय पाटील हे भाजपा मध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत.त्यांच्या पक्षांतर्गत कार्याची दखल घेऊन नुकतीच त्यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या पुसद जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.ते आपल्या निवडीचे श्रेय निवडीचे श्रेय भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा,आमदार नामदेवराव ससाणे,भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, माजी आमदार राजेंद्र नजरधने,चंदन पांडे,इरफान कुंदन,अमर दळवी,रवि पांडे,योगेश वाजपेयी,नरेंद्र शिदे यांना देतात.विजय पाटील यांच्या निवडीचे सर्वस्थरातून स्वागत होत आहेत.
