शेतीकरीता शेतक-यांना पिकाला पाणी देण्यासाठी दिवस रात्र विनाखंडीत विज पुरवठा करावा शिवसेनेचा इशारा (ऊ.बा.ठा.गट)


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


सध्या पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. महिण्याभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थीती मध्ये ज्या शेतक-यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतक-यांना सुध्दा महावितरणच्या मनमानी कारभारामुळे आपल्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. ढाणकी परिसरात महावितरण कंपनीने शेतक-याला पुरवण्यात येणा-या विजपुरवठा ची वेळ कमी केल्याने पाणी असुनही विज नसल्याने आपली पिके नजरेसमोर नष्ट होताना बघत आहे. ढाणकी परिसरात शेतक-यांना फक्त काही तास वेळ पाणी देण्याकरीता मिळत असल्याने त्यांना पुर्ण शेतीचे क्षेत्र सुद्धा भिजवणे होत नाही आधि च आसमानी संकट आणि त्यात कंपनीचे सुलतानी जुलुम यामुळे मरावे की जगावे अशी स्थिती शेतकऱ्यापुढे निर्माण झाली आहे आपला अन्नदाता महावितरणच्या नाकर्तेपणामुळे पिचुन जात असून त्यांना आपले पिके वाचवण्याची सुरळीत आणि जादा वेळ विज पुरवठयाची गरज आहे तेव्हा आपण जो सहा तासाचा वेळ शेतक-यांना दिला आहे तो वाढवुण द्यावा जेणे करून ज्या शेतक-यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांना तरी आपली पिके वाचवता येईल. जर आपल्या कडुन या निवेदणाचा कोणताही सकारात्मक विचार झाला नाही तर आम्हाला शेतक-यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल यावेळी रमेश गायकवाड,संजय कुंभरवार, बंटी जाधव, संभाजी गोरठकर, गणेश नरवाडे, एजास पटेल, प्रशांत जोशी, गजानन आजेगावकर, अशोक कोरटवार, विशाल नरवाडे, गजानन धोपटे बजरंग चव्हाण, रमेश चिंचोलकर, सुंदरकांत वासमवार, अविनाश पानपटे, यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.