
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यातील वेडशी येथे असलेल्या मोक्षधामात(स्मशानभूमीत) महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिं २ मार्च २०२४ रोज शनिवारला करुणानिधी भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
येथीलच वासेकर कुटुंबियाची बऱ्याच दिवसापासून स्मशानभूमीत भगवान शंकराची मूर्ती देण्याची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि वासेकर कुटुंबियां च्या सहकार्यातून तसेच वेडशी येथीलच सरपंच अंकुश मुनेश्वर यांच्या सहकार्यामुळे साकारलेल्या या वासेकर कुटुंबाच्या स्वप्नाला पुर्ती मिळाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी उपस्थित मा. वसंत पुरके सर माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य,अरविंद वाढोणाकर उपसभापती कृ. उ. बा. स. राळेगाव, जानराव गिरी उपनगराध्यक्ष राळेगाव, राऊत सर, डॉ. जवादे, प्रदिप ठुणे, रवी देशमुख, अप्सरअली सैयद ,बाळासाहेब इंगोले, प्रकाश पोपट, पुरुषोत्तम चिडे, किशोर धामंदे,बाळासाहेब खैरकर तसेच गावातील महिला व नागरीकांची प्रामुख्याने उपस्थिती होते.
