बातमी प्रकाशित होताच
गावात दारू माफियांवर कारवाई

सहसंपादक : रामभाऊ भोयर

 

गेल्या अनेक महिण्या पासून पवनार इथे खुले आम दारू विक्री सुरू होती त्या मुळे गावातील सहा तरुणांना गावठी विशारी दारूने जीवास मुकावे लागले परिणामी नवराष्ट्र ला बातमी प्रकाशित होताच सेवाग्राम पोलीस प्रशासनाला जाग आली सेवाग्राम पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मौजा पवनार गावात दारूबंदी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करत वाहनासह गावठी मोहा दारू एकूण किमत 63,200/- चा माल जप्त करण्यात आला तसेच दारूबंदी कायद्यान्वये 1) हेमंत पाटील रा. पवनार 2) बाबा चंद्रभान बावणे रा.पवणार 3) संदीप उर्फ नागो लाखे रा. पवनार 4) किसना कुमरे रा. पवणार 5) प्रमोद सुरजुसे रा.पवणार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मारोती काटकर, विठ्ठल दुधकोहळे, पो. हवा. हरिदास काकड, किशोर पेटकुले, कारभारी घुगे, नापोशि. गजानन कठाणे, संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे, वैभव चरडे, यांनी कारवाई केली.असून ग्रामस्थांना कडून पोलीस प्रशासनाचे कौतुक व्यक्त केले आहे तसेच पोलीस प्रशासनाने असेच दारू विक्रेत्यांवर कठोर सातत्याने कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.