पावसाने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दोन दिवसापासून शहरात तसेच तालुक्यात पडत असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र या अतिवृष्टीने पाणी आणले आहेत.गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापूस तुरीसह काही ठिकाणी हरभरा पिकाचे नुकसान झाले आहेत सोबतच बागायती पिकाचेही मोठे नुकसान झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुठून आहेत तो कापूस आता ओला झाला आहे काही दिवसांनी तो कापूस वाळेलही पण पावसासोबत हवा असल्याने काही ठिकाणी तो कापूस जमिनीवर पडला तसेच या पावसाने कापसाला डाग पडणार असून त्याला पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांना मिळणार नाही सुरुवातीच्या अतिवृष्टीने कापसाला सुरुवातीला पाहिजे तसा माल नव्हता आता कपाशीला शेंडयावरती पाति फुलं बोड आले होते कपाशीचे वजन वाढले आहेत पावसासोबत हवा असल्याने कपाशीचे झाड आता एकमेकावर पडली आहेत काही ठिकाणी तुटले आहेत .कपाशी सोबतच तुरीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिवळी झालेली तूर आता आता हिरवी झाली आहेत .

तुरीला मोठ्या प्रमाणात फुल आले होते संपूर्ण तुर हि फुलांनी पिवळी झाली होती दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने तुरीच्या झाडाचे फुल पूर्ण पडले असून ति तुर आता हिरवी झाली आहेत सोबतच या अतिवृष्टीने तुरीवर बुरशी रोगाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे तीन ते चार फवारे घेऊन शेतकऱ्याने तूर ही तयार केली होती या अतिवृष्टीने आता पुन्हा शेतकऱ्यांना तुरी पीकावरती पहिल्यापासून मेहनत घ्यावी लागणार आहे यामुळे शेतकऱ्याचा खर्च व वेळ वेळ वाढणार आहेत सोबतच उत्पादनात मात्र घट येणार आहे. नुकतेच तालुक्यात रब्बी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गहू हरभरा लावला गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा मोठा आहे शेतकऱ्यांनी पाणी देऊन हरभरा काढला दोन दिवस झालेल्या पावसाने अशा शेतात काही ठिकाणी आता पाणी साचले आहेत हरभऱ्याला जास्त पाणी नको असते ज्या ठिकाणी असे पाणी साचल्यास त्या ठिकाणचा हरभरा आता मरणार जास्त पाण्याने हरभऱ्यावरती मर रोग येतो या मर रोगाचा सामना सुद्धा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आता करावा लागणार आहेत एकंदर सर्वच पिकांसोबतच बागायती पिकालाही या अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला कारण पावसासोबत हवा होती यामुळे टमाटे पालक सोबत इतर बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे अलीकडच्या काळात भाजीपाल्याचे दर हे वाढू शकतात एकंदरीत सर्वच पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला .आता धुयारीचा सामना शेतकऱ्याला करावा लागणार पावसासोबतच धुयार ही सुद्धा येणार आहेत या धुयारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहेत कारण या धूयरी पासून पीकही वाचवावे लागणार आहेत धुयारी मुळे तुर पिकाचे सगळ्यात जास्त नुकसान होते एक-दोन दिवस धुयार राहिल्यास तुरीचे पिके खरडल्यासारखेच होते सोबतच धुयारीचा फटका कपाशीला सुद्धा बसणार आहे या अवकाळी पावसामुळे धुयार येणार आणि तिचा सामना आता शेतकऱ्यांना करावा लागणार आहेत ज्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढणार आहेत आणि उत्पादन मात्र कमी होणार आहेत. पंचनामे करण्याचे आदेश दिले शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत शासन प्रशासन पंचनामे करतील पण अजून जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही आता या नुकसानीचे पंचनामे कधी करणार त्याचा अहवाल शासनाला कधी देणार आणि त्याची कधी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार हा प्रश्नच आहे अलीकडच्या काळात नुकसान झाले की पंचनामे करायला सांगायचे आणि नुकसान भरपाई मात्र द्यायची नाही हा नवीन फंडा शासन प्रशासन राबवत असल्याचे दिसते.झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे त्याचे होणारे परिणाम याकरता कोणती खबरदारी घ्यावी याबाबत कृषी विभागाने काही उपाय योजना सांगितले आहेत त्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये जाळ करावा सोबतच पिकावर 13 0 45 सारखे वरखत फवारावे अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी शेतकऱ्यांना केले आहेत.