राळेगाव पोलीस स्टेशनचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

गुन्हा आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली मध्ये राळेगाव पोलीस स्टेशन अव्वल असल्याने मासिक गुन्हे आढावा सभे मध्ये पोलीस स्टेशन राळेगाव चा CCTNS DATA फिडींग मध्ये सप्टेंबर 2023 या महिन्या मध्ये यवतमाळ जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्या बद्दल मा. पोलीस अधीक्षक यांच्या तर्फे चषक आणि प्रशस्ती पत्र देऊन पो.नि. रामकृष्ण जाधव, पो उप नि. मोहन पाटील आणि महिला पोलीस अंमलदार दर्शना आडे यांचा गौरव करण्यात आला, गुन्हा आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली मधे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला असल्याने त्यांची सर्व स्तरावरून सृती करण्यात येत आहे.