

प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी आणि परिसरात पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अनेकांनी वरून राजा मनसोक्त बरसावा व शेत शिवार चिंब व्हावे यासाठी अनेक शक्कल लढविल्या आणि अनेक ठिकाणी महापंगत सुद्धा केल्या तर धोंडी धोंडी पाणी दे असा सूर आळवण्यात आल्याचे चित्र बघायला सगळीकडे मिळाले पण मागील चार ते पाच दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने शेतकरी व्यापारी सर्वच हैराण झाले आहे सततच्या मुसळधार पावसाने विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला शिवाय नदी आणि नाल्या शेजारील शेत जमिनीतील पिके जमीन दोस्त झाली आहे पावसाच्या संतत धारेमुळे संपूर्ण ढाणकी परिसरात अक्षरशः हाहा कार माजला असून काही ठिकाणी काल रात्रीच्या वेळी ढगफुटी सदृश्य पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागातील नाल्याकाठच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले दरम्यान विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्त्वाचा दुवा असलेला धनोडा येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने विदर्भ मराठवाड्यातील सर्व वाहतूक ठप्प आहे त्यामुळे नांदेड उमरखेड जाणाऱ्यांनी व येणाऱ्यांनी अति धाडस करू नये असे आव्हान वेळोवेळी प्रशासनाच्या मार्फत केल्या जात आहे दरम्यान बिटरगाव कडे जाणाऱ्या पुलावर देखील गेल्या तीन ते चार दिवस बरसत असलेल्या पावसामुळे कमरे इतके पाणी ओसंडून वाहत आहे तसेच नाल्याच्या पलीकडच्या बाजूला ज्या कास्तकारांची शेती आहे अशा शेतकऱ्यांनी आपली जनावर गोठ्यातच बांधली आहे पण त्यांना पुलावरून पाणी असल्याकारणाने जाता येत नसल्याने दुभत्या गाईची व बैलांची चाऱ्या वाचून आबाळ होत असल्याचे बोलके चित्र सध्या दिसत आहे शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला असून शासनाने मदत केल्याशिवाय शेतकरी या संकटातून सावरणार नाही एवढे खरे
