पत्रकार सुरेंद्रभाऊ राऊत यांना दिलेल्या धमकीचा वडकीत निषेध, कठोर कारवाईसाठी पत्रकार संघटनेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन.


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


पत्रकार सुरेंद्रभाऊ राऊत यांना राशन तस्कराने दिलेल्या धमकीचा वडकी येथील पत्रकारांनी जाहीर निषेध नोंदवून या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना वडकीच्या ठाणेदारामार्फत देण्यात आले.
जिल्ह्यातून सुरू असलेल्या राशन तस्करीचे वृत्त प्रकाशित केल्याने लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपसंपादक सुरेंद्रभाऊ राऊत यांना शेख रहीम शेख करीम या राशन तस्कराने फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली होती.या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले असुन आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहेत.आज १२ आॅगस्ट रोजी स्व.पि.एल.सिरसाठ प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ शाखा राळेगावच्या वतीने वडकी परीसरातील पत्रकारांनी निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा व त्याचेही विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन वडकीचे ठाणेदार विनायकराव जाधव यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीपराव पाटील भुजबळ यांना देण्यात आले.यावेळी वडकी परीसरातील प्रमोदभाऊ गवारकर, मंगेशभाऊ चवरडोल, शंकरभाऊ जोगी,दिपकराव पवार,अजिजभाई शेख, श्रीकांतराव कावडे, दिनेशभाऊ सराटे, प्रविणभाऊ लोडे आदी पत्रकार उपस्थित होते.