राळेगाव येथे ‘गुरुदेव नँचरोपँथी अँण्ड योगा कॉलेज’चा शुभारंभ… .

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर










अति आधुनिकतेच्या नावाखाली होत असलेली आरोग्याची क्षती , गोळ्या इंजेक्शन्स चा अति वापर , विषयुक्त आहार , अनियमित जिवनशैली यामुळे मानवीय आरोग्य धोक्यात आले आहे , म्हणून सर्व मानव जातीचे आरोग्य सुद्रुढ रहावे या सद्भावनेतून प्रत्येकाला निसर्गोपचार चा अभ्यास व्हावा या हेतूने राळेगाव सारख्या आदिवासी बहुल भागात ” गुरुदेव नँचरोपँथी अँण्ड योगा कॉलेज ” ची स्थापना केली आहे. या कॉलेजचे उद्घाटन डॉ. हिवरे , डॉ. ज्ञानेश्वर मुडे , राळेगावचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम व उपनगराध्यक्ष, जानराव गीरी यांचे हस्ते पार पडले .
या उद्घाटनप्रसंगी राळेगाव भागातील प्रतिष्ठित नागरिक , मनोज मानकर , प्रदिप ठुणे , गौतमजी शर्मा , गजानन निवल , सुनील भामकर , सातपुते महाराज , सुरकर महाराज , सतीश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात
या कॉलेजचे संचालक , प्रकाश झलके व धनंजय सेगेकर यांनी अथक परिश्रमातून ” गुरुदेव नँचरोपँथी अँण्ड योगा कॉलेज ” ची स्थापना केली .