कळमनेर ते वाऱ्हा शेतपांदण रस्ता मंजूर करणेबाबत गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील कळमनेर ते वाऱ्हा हा पांदण रस्ता सद्या स्थितीत खूप खराब झालेला असून सदर पांदण रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहे तसेच पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतातील पाणी पांदण रस्त्यावर येऊन साचून राहत असल्यामुळे सदर पांदण रस्त्याने बैलबंडी ने – आण करता येत नाही व त्या रस्त्याने पायदळ सुद्धा जाण्यास शेतकऱ्यांना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून या पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेत मजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे याचा परिणाम शेती उत्पन्नावर सुद्धा होताना दिसत आहे. गट ग्रामपंचायत कळमनेर येथे ता.9/7/24 रोजी मा. सरपंच सौ नीता पंकज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली त्या सभेत मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत मौजा कळमनेर येथे वाऱ्हा ( शिव ) ते कळमनेर हा शेत पांदण रस्ता मंजूर करण्यात आला असून मातोश्री ग्राम समृद्धी शेतपांदण रस्ता मंजूरी मिळवून तयार करून देण्यात यावा या आशयाचे निवेदन आज राळेगाव येथील गटविकास अधिकारी केशव पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप ) तालुकाअध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष (अप ) शुभम कांबळे, पराग मानकर, राजू वैरागडे, संतोष वानखेडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते