सरसम बु येथे जंगी कुस्त्यांचा डाव रंगला

…… हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु) दि २/४/२०२३ रोज जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,या वर्षी बारशी निमित्त बसवेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित केला.या जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमास तालुका जिल्हा नव्हे तर आदिलाबाद , देगाव , भोकर अर्धापूर ,नांदेड परभणी तसेच अनेक दूरवरच्या खेड्यापाड्यातून आणि कुस्त्या खेळण्यासाठी नामवंत मल्लांनी आणि गुणांनी परिपूर्ण असलेल्या मल्लांनी हजेरी लावली होती ,तसेच या मैदानात जंगी कुस्त्यांच्या सामान्यातील दृश्य प्रेक्षकांना प्रतिसाद मिळाला आहे. आणि कुस्ती कमिटी तर्फे जारी केलेल्या नियम आणि अटीच्या आधारावर या कुस्त्या खेळण्यात आल्या यासाठी प्रथम बक्षीस. ५५५५ प्रकाशराव विठोबा वानखेडे यांच्या स्मरणार्थ अँड अतुल प्रकाशराव वानखेडे (उपसरपंच ) यांच्यातर्फे होते, पहिल्या क्रमांकाचे बक्षीस बोरगडी येथील पैलवान निलेश यांनी जिंकले, तर दुसरे बक्षीस ३३३३ कै माधवराव गोविंदराव ढेमकेवाड यांच्या स्मरणार्थ श्री रमेशराव माधवराव ढेमकेवाड सहशिक्षक यांच्यातर्फे होते. तिसरे बक्षीस २२२२ गणेश साईनाथ दारपवाड यांच्यातर्फे ठेवण्यात आले. सर्व नामांकित मल्लांच्या कुस्त्या या आखाड्याकडे दिसून आला, शेवटच्या कुस्तीचा सामना खुप वेळ चालू होता, या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ शिंदे यांनी केले, व कुस्त्याच्या कार्यक्रमास सोबतच भव्य महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर कमिटी चे अध्यक्ष श्री नामदेव गंगाराम डाके, उपाध्यक्ष काशिनाथ रामजी मंडलवाड ,सचिव संजय बाबुराव पसलवाड, कुस्ती कमिटी, अध्यक्ष साईनाथ लक्ष्मण शिंदे ,उपाध्यक्ष रमेश माधवराव ढेमकेवाड सहशिक्षक, सचिव केशव विठ्ठल मंडळ वाड, सल्लागार उत्तम व पोशटटी,व तसेच मंदिर कमिटी व कुस्ती कमिटी सदस्य यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या .व सरसम चे श्री सरपंच काशीबाई ठाकूर व माजी सरपंच सुनील वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मोकासवाड, मोहन राहुलवाड , गजानन शिंदे, सदस्य संतोष डाके,. माधव बोले, बालाजी मंडलवाड, संतोष कदम महाराष्ट्र पूर्व संपादक विजय वाठोरे, पत्रकार प्रशांत राहुलवाड गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते,