
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
एज्युकेशन फाउंडेशन च्या युथनेट प्रोग्राम अंतर्गत झाडगाव आणि रावेरी या दोन गावांमध्ये क्रिएटिव्हिटी कीटचे वितरण करण्यात आले. गावातील 10 ते14 वयोगटातील मुलांमध्ये विविध क्रिएटिव्हिटी असतात . आणि त्या मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्याला कुठेतरी चालना मिळावी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याच्या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अशा प्रकारचे विविध प्रोग्राम या मुलांसाठी घेऊन त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवा आणि यांच्यातील सुप्त गुण बाहेर यावे या करिता सतत कार्य करत असते . याच अनुषंगाने झाडगाव आणि रावेरि या दोन गावांमध्ये या किटचे वितरण करण्यात आले. तसेच त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ची माहिती देऊ आपला गाव कसा बेरोजगार मुक्त करता येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच शाळेत शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि विद्यार्थी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते या उद्देशाने झाडगाव आणि रावेरी या दोन्ही गावांमध्ये या कीटचे वितरण करण्यात आले. त्यावेळी झाडगाव येथील सरपंच बाबाराव किनाके ,तसेच रावेरी येथील सरपंच राजेंद्र तेलंगे, नागरिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच विद्यार्थी आणी त्या गावातील स्वयंसेवक तसेच राळेगाव तालुक्यातील मेंटर मयुरी वादाफळे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
