
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व.चांदीबाई शिक्षण संस्था वडद ता. महागांव जी. यवतमाळ द्वारा संचालित मधुकरराव नाईक* निवासी मूकबधिर विद्यालय ढाणकी या शाळेचा
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यानी शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या मध्ये कु. दमयंती कुंदन आडे 67.20 टक्के ,कु. सरस्वती नागोराव थोटवे 64 टक्के , माधव बालाजी मीराशे 67.20 टक्के ; विकास रामचंद्र डोंगरदिवे 71.80 टक्के ‘ विश्वास दामू पवार 66.80 टक्के, दीपक रमेश चौधरी (Isolated)Pass ‘ विकी गणपत राठोड(Isolated)Pass . या
विध्यार्थी नी आपल्या यशाचे श्रेय सर्व विषय शिक्षकाना दिले असून संस्थेचे मानद सचिव शेषेराव पवार व सदस्य सुदर्शन पवार मुख्याध्यापक ए. के. भोने यांनी सर्व विध्यार्थी व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .
