
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ व निवडणूक 2026 या बाबतीत मतदार नोंदणी आढावा बैठक व शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी व शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आतापर्यंत 18 प्रतिनिधींनी सभागृहात काम करून शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.या अनुषंगाने 2026 मध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिलीप भिमराव कडू सरांना तिकीट दिले आहे या बाबतीत आतापर्यंत झालेल्या मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रेणुका मंगल कार्यालय माहूरे ले आऊट येथे दिनांक 16/11/2026 रोज रविवारला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार व्हि.यू. डायगव्हाणे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर सर दुसरे प्रांतिक उपाध्यक्ष विजय ठोकळ सर विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे सर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू सर आय.टी.आय.निर्देशक संघटना भोजराज काळे सर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघ किशन पुंड सर सदस्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आनंद मेश्राम सर यांची विशेष उपस्थिती राहणार असून यवतमाळ जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजिवन सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर, यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर व कार्याध्यक्ष विजय खरोडे सर यांनी केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
