
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकतीच यंदाची दिवाळी संपली आता तुळशीचे लग्न संपले अन् जिल्ह्यासह तालुक्यात सध्या नगरपालिका नगरपरिषद ,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून राजकीय फटाके धुमधडाक्यात फुटू लागले आहेत.
दुसऱ्या बाजूला दुसऱ्या तिसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांना नेतेमंडळी कडून जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी देण्याचे गाजर दाखवून बोहल्यावर चढवले जात आहे मात्र मुळात निवडणुकीसाठी गटासह गणात जागा किती आणि आश्वासन किती जणांना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहाची मुदत संपून सुमारे साडेतीन वर्ष अधिक काळ लोटलाय मात्र कोरोना ,अवकाळी पाऊस, आणि मराठा, धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या वादामुळे निवडणुका मुदतीत झाल्या नाहीत त्यामुळे मिनी मंत्रालयाचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तर पंचायत समितीची जबाबदारी त्या त्या गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याने प्रशासकराज सुरू होते न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या असून गटगणामध्ये आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे गेल्या मागील काही दिवसापासून दुसऱ्या फळीत काम करणारे सर्वच पक्षाचे भूमिकेत कार्यकर्ते सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत अनेकांना दिवसाढवळ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागली आहेत यंदा काहीही होऊ दे निवडणूक लढवायचीच असा निश्चय करून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत.
नेमका याचाच फायदा नेत्यांनी तुम्हाला यंदा झेडपी सदस्य करणार पंचायत समिती साठी तुमची उमेदवारी ‘फिक्स बरं का’ अशा प्रकारची आश्वासने देण्यात येत आहेत तुम्हीच तो चेहरा आहे तुम्हालाच पंचायत समितीचे सभापती,सदस्य करायचे आहे अशी ऑफर देण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे याच आश्वासनांवर इच्छुकांची गाडी सुसाट वेगाने धावत आहे काही नेत्यांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा पद्धतशीरपणे वापर सुरू केला आहे त्यामुळे अनेक जण आतापासूनच नेतिगिरीसाठी सक्रिय झाले आहेत
आरक्षणामुळे अनेकांना उकळ्या कित्येकांना जांभळ्या तर काहीजण तटस्थ
राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण असून यानुसार जवळपास साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षणामुळे अनेकांची गोची झाली तर अनेकांची राजकीय समीकरणे बदलली आहेत तर कित्येकांना तटस्थ राहावे लागणार असल्याने शेजारच्या गटात आपली डाळ शिजेल का याची चाचपाणी सुरू आहे.
