वर्धा नदीच्या पात्रात उडी घेऊन वडकी येथील नामांकित डॉ सुरेंद्र ठमके यांची आत्महत्या,परिसरात हळहळ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दि 29 ऑगष्ट रोजी दुपारी 12 च्या सुमारास वडकी येथील नामांकित डॉ सुरेंद्र ठमके यांनी वर्धा नदीच्या पुलावरवरून 100 फूट उंचीवर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडकी येथील परिसरात नामांकित व प्रसिद्ध असलेले डॉ सुरेंद्र ठमके यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास वर्धा नदीच्या पात्रात 100 फुट उंची असलेल्या पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना दुपारच्या सुमारास माहिती होताच घटनास्थळी पुलावर हजारोच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. पुलापासून 2 किलोमीटर अंतरावरील असलेल्या एका झाडाला त्यांचा मृतदेह अडकून होता.सुमारे दोन ते तीन तासांनी पोलिसांच्या समक्ष मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला,घटनास्थळी वडकी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह श्वावच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आला आहे.डॉ सुरेंद्र ठमके यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून नेमकी यांनी पुलावर उडी मारून आत्महत्या का केली नेमके आत्महत्या करण्यास कोणते कारण,त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेचा पुढील तपास आता वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.डॉ सुरेंद्र ठमके यांच्या पश्चात पत्नी दोन मूल असा आप्त परिवार आहे,यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,