संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:-आशिष नैताम

समस्त तेली समाजाचे जनक आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती ८ डिसेंबर रोजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म झाला आणि तेली समाजाचा उद्धार झाला या महापुरुषांच्या प्रतीमेला पोंभूर्णा येथील तेली समाज बांधवांनी पूष्पहार अर्पण करीत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली येवेळेस पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सुलभाताई गुरुदास पिपरे, माजी नगरसेवक मोहनजी चलाख,डॉ. एन. जी. नैताम, जगन कोहळे, नंदकिशोर बुरांडे, बंडूजी बुरांडे, उमेश धोडरे, दिपक कुनघाडकर, देवतळे व तेली समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते